मराठी
Your Allotment
Aane
Pai
Total 7/12 Area
Ares
Your Share:
Hectare
Ares
Share %
Aanewari helps you calculate your land share from aanewari (annewari) measurement systems to modern day hectare-are(metric system) systems which helps in finding actual land share of owner.

सात-बारा वरील आणेवारी (Aanewari) कशी काढावी.

सात-बारा वरील आणेवारी (Aanewari)

बर्‍याच 7/12 उतार्‍यांवर व्यक्तीच्या नावासमोर चार आणे क्षेत्र, आठ आणे क्षेत्र, दोन आणे चार पै. क्षेत्र इत्यादी लिहिलेले असते. याला आणेवारी म्हणतात. अशी आणेवारी लावतांना खातेदाराने अर्ज केल्यावर, तलाठी आणि मंडल अधिकारी जबाब, पंचनामा करुन तहसिलदारांकडे अहवाल पाठवतात. त्यानंतर तहसिलदार योग्य ती चौकशी करुन म.ज.म.अ. कलम 85 अन्वयेच्या आदेशाप्रमाणे लावणे आवश्यक असते. परंतू आज अनेक ठिकाणी तहसिलदारांचा याबाबतचा आदेश आढळून येत नाही. काही ठिकाणी फक्त अर्जावरुन अशी आणेवारी दाखल असल्याचे दिसून येते जे अवैध आहे.

जमिनीच्या 7/12 उतार्‍यावर आणेवारी लावण्याची पध्दत ब्रिटीश काळात अँडरसनच्या कारकिर्दीत रुढ झाली असे म्हटले जाते. पूर्वी अर्थक्षेत्रातील व्यवहारात प्रचलीत आणे, पैसे पध्दतीचा यावर प्रभाव आहे. महसूल खात्यात प्रचलीत या पध्दतीनुसार एक आणा म्हणजे बारा पैसे, 16 आणे म्हणजे एक रुपया, 192 पैसे म्हणजे 16 आणे म्हणजेच एक रुपया.आणे ‘ या चिन्हाने दर्शविले जातात आणि पैसे ‘‘ या चिन्हाने दर्शविले जातात आणेवारी काढतांना एकुण क्षेत्रफळ गुणीले हिश्याची आणेवारी पै. मध्ये भागीले 192 या सुत्राने क्षेत्र काढले जाते.

दशमान पध्दती अंमलात आल्यानंतर जमिनीबाबत चाळीस गुंठ्याचा एक एकर आणि शंभर गुंठ्याचा एक हेक्टर असे समीकरण झाले. मेट्रीक पध्दतीत ‘गुंठा’ या ऐवजी ‘आर’ असे मोजमाप रुढ झाले. परंतू मेट्रीक पध्दतीचे मोजमाप दशमान पध्दतीत बसवतांना गुंठ्यापेक्षा ‘आर’ चे क्षेत्र पाच चौरस फुटाने कमी असे गणित झाले. जमिनीच्या क्षेत्राची वाटणी दशमान पध्दतीने करणे अवघड असल्याने आणे-पैसे पध्दत सुरु राहीली. आणे-पैसे पध्दतीनुसार जमिनीचे क्षेत्र कितीही असले तरी ते 192 पैसे म्हणजे 16 आणे म्हणजेच एक रुपया मानले जाते.

उदाहरण-1: एका जमिनीचे क्षेत्र 1 हेक्टर 20 आर आहे. त्यात ‘अ’ चा हिस्सा चार आणे आहे. प्रथम चार आण्याचे पै मध्ये रुपांतर केले जाते. (एक आणा =12 पैसे म्हणून 12 पैसे गुणीले 4 आणे = 48 पैसे.)

* 1 हेक्टर 20 आर क्षेत्र = 120 आर. म्हणून 120 (आर) गुणीले 48 पैसे (4 आणे हिस्सा) भागीले 192 पैसे (16 आणे म्हणजेच एक रुपया) = 30 (आर) म्हणजेच 1 हेक्टर 20 आर क्षेत्रामध्ये ‘अ’ चा हिस्सा चार आणे हिस्सा हा 30 आर आहे.

सर्वांना समान वाटप करून सुध्दा 2 किंवा 3 पै क्षेत्र शिल्लक राहील्यास प्रथा/परंपरेनुसार मोठ्या दोन/तीन भावांना असे शिल्लक क्षेत्र प्रत्येकी सम प्रमाणात वाटले जाते.

उदाहरण-2: एका जमिनीचे क्षेत्र 10 एकर (400 आर) आहे असे मानले तर त्याचे वाटप: * त्याचे वाटप दोन भावांत -प्रत्येकी आठ आणे (अर्धा हिस्सा; 5-5 एकर) होईल. * त्याचे वाटप तीन भावांत-प्रत्येकी पाच आणे चार पै. (1/3 हिस्सा; 133.33 आर) होईल. * त्याचे वाटप चार भावांत -प्रत्येकी चार आणे (1/4 हिस्सा; अडीच एकर) होईल. * त्याचे वाटप पाच भावांत -प्रथम प्रत्येकी तीन आणे वाटले जाते तर पंधरा आणे क्षेत्र झाले. शिल्लक राहीलेला एक आणा (12 पै.) पाच भावांमध्ये प्रत्येकी 2 पै असा वाटला जातो. उर्वरीत 2 पै क्षेत्र, प्रथे/परंपरेनुसार दोन मोठ्या भावांना प्रत्येकी 1 पै असा वाटले जाते. म्हणजे दोन मोठ्या भावांना तीन आणे तीन पै (81.25 आर प्रत्येकी) क्षेत्र तर तीन भावांना, तीन आणे दोन पै क्षेत्र (79.17 आर प्रत्येकी) असे वाटप होते. * त्याचे वाटप सहा भावांत-प्रत्येकी दोन आणे आठ पै. (66.67 आर प्रत्येकी) होईल. * त्याचे वाटप सात भावांत- प्रथे/परंपरेनुसार प्रथम तीन मोठ्या भावांना प्रत्येकी 2 आणे 4 पै. (58.34 आर प्रत्येकी) असे वाटले जाते. तर चार भावांना दोन आणे तीन पै क्षेत्र (56.25 आर प्रत्येकी) असे वाटप होते. * त्याचे वाटप आठ भावांत-प्रत्येकी दोन आणे (50आर प्रत्येकी) असे होईल. * त्याचे वाटप नऊ भावांत- प्रथे/परंपरेनुसार प्रथम तीन मोठ्या भावांना प्रत्येकी 1 आणे 10 पै (45.83 आर प्रत्येकी) असे वाटले जाईल. इतर सहा भावांना 1 आणे 9 पै (43.875 आर प्रत्येकी) असे वाटले जाईल. * त्याचे वाटप दहा भावांत- प्रथे/परंपरेनुसार प्रथम दोन मोठ्या भावांना प्रत्येकी 1 आणे 8 पै (41.68 आर प्रत्येकी) असे वाटले जाईल. इतर सहा भावांना 1 आणे 7 पै (39.58 आर प्रत्येकी) असे वाटले जाईल. एखादी व्यक्ती मयत झाली तर तिच्या नावासमोरील आणे, पै. च्या हिश्श्याला तिच्या वारसांची नावे लावता येतात.

दोन समान हिस्से म्हणजे प्रत्येकी आठ आणे क्षेत्र; तीन समान हिस्से म्हणजे प्रत्येकी पाच आणे चार पै क्षेत्र; चार समान हिस्से म्हणजे प्रत्येकी चार आणे क्षेत्र; पाच समान हिस्से म्हणजे प्रत्येकी तीन आणे तीन पै क्षेत्र; सहा समान हिस्से म्हणजे प्रत्येकी दोन आणे आठ पै क्षेत्र; सात समान हिस्से म्हणजे प्रत्येकी दोन आणे चार पै क्षेत्र; आठ समान हिस्से म्हणजे प्रत्येकी दोन आणे दोन पै क्षेत्र.

Comments

आणेवारी तुम्हाला तुमच्या जमिनीचा वाटा मोजण्यात मदत करते आणेवारी (आणेवारी) मोजमाप प्रणालीपासून आधुनिक काळातील हेक्टर-आर (मेट्रिक प्रणाली) प्रणाली जे मालकाचा वास्तविक जमीन वाटा शोधण्यात मदत करते.